भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥ देखोनियां चोज भुलल्या नरनारी । देहभावें वरी वोंवाळिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वानारांच्या संगें स्वयें क्षेम देसी । मज ह्रषिकेशी न बोलावें ॥१॥ रिसांपाशीं सदा स्वाभावें तुम्ही खेळा । माझिया कपाळा नातुडसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वामांगी बाहुली तूर्या दावी कळा । ते लक्षी पाउलां रामरूप ॥१॥ माया निजरूप दक्षिणांनीं वसे । तूर्येचा हा भास मावळला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥१॥ तूं काय म्हणसी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उठोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥ धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे । काय करुं धुरे भीत असों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥ उद्धव नारदा अंबरिष शुक । बळी धरुवादिक आले भेटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥ हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥ दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥ कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी ॥१॥ सोडवीं गा देवा दीनदयानिधी । मी एक अपराधी दास तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥ निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्‍यांशीं लक्ष सोंगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासरूं भोवे खुंटियाभोवतें । आपआपणियातें गोवियेलें ॥१॥ तैसी परी मज जाली गा देवा । गुंफलोंसे भावा लटिकिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासुदेवा हषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥ पद्मनाम त्रिलोकेशा वामना शेषशायी । आह्माम कोणी नाहीं तुजवीण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाहातसे नेत्रीं इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया ॥१॥ क्षमा करीं आतां अच्युता अनंता । अगा कृष्ण-नाथा दीनबंधू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू ॥१॥ सांडूनि वैकुंठ आले जगजेठी । वस्ती वाळवंटीं केली जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या ॥१॥ गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव