भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी

valmikadi bhishma dron krupacharya | drupadatanaya dili bheti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥ उद्धव नारदा अंबरिष शुक । बळी धरुवादिक आले भेटी ॥२॥ देवी देवऋषी गोपाळांसहिता । भाष्यकारें नीत शुद्ध केली ॥३॥ नामा म्हणे आतां पाहूं नको देश । पतितास यश तुझे नामीं ॥४॥