भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी ॥१॥ हरी उच्चारण करी हा विचार । नामचि साचार उद्धरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी ॥१॥ जयाचिये कुळीं पंढरीची वारी । विठो त्याचे घरीं बाळलीळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ ॥१॥ विठठल हा वृत्ति विठठल जपणें । चित्त वित्त मनें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठा नामायाचा आला पंढरपुरा । भेटला सोयरा विटेवरी ॥१॥ सुखदु:ख अवघें सांगितलें श्रीहरी । धरणें तुझे द्वारीं घेईन देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध ॥१॥ ऐक्य सुख घ्यावें एकविध भावें । प्रेम न संडावें आवडीचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥ शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥ विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल आमुचें सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥ विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥१॥ युगें अठ्ठावीस झालीं । दोघां नाहीं बोला बोली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥ गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा ॥१॥ न सांगतां सर्व जाणे तान्ह भूक । जवळी व्यापक न विसंबे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल विद्‌गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामें तुझीं ॥१॥ पाव गे विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव