भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी समचरण सुंदर । बाळ सकुमार यशोदेचें

vitevari samacharan sundar | bal sakumar yashodechen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विटेवरी समचरण सुंदर । बाळ सकुमार यशोदेचें ॥१॥ वाळे वांकी गर्जे तोडर चरणीं । नाद झणझणी वाजताती ॥२॥ कांसे कसियेला पीत पीतांबार । लोपे झडकर तेणें प्रभा ॥३॥ नामा ह्मणे नाहीं तुझ्या रूपा पार । तेथें मी किंकर काय वानूं ॥४॥