भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी । परी तुज ऐसा सृष्टीं देव नाहीं ॥१॥ दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा । मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वत्साकारणें मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये ॥१॥ तैसें तुझें वासरूं बांधलों मी असें । मज लावे कांसे आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण ॥१॥ या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वंदावें तें काय निंदावें तें काय । सर्वांठायीं पाहें कों-दाटलें ॥१॥ आहे कवणा ठायीं नाहीं कवणा ठायीं । ठायींच्या पैं ठायीं कोंदाटलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥ गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥ होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वनामध्यें कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती ॥१॥ निशींमाजीं व्याघ्र फिरताती रानीं । जावें सक-ळांनीं घरां आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥ इतक्यामध्यें होन मडकेंभर काढिले । गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत ॥१॥ मुख तें सिंहाचें शरीर मानवाचें । भयंकर देवाचें रूप असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें बिव्न झालें. ऐका ॥१॥ आकाशींची वानी सांगतसे कंसा । मानी हा भरंवसा बोलण्याचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे ॥१॥ उदंड उपास कासया करावे । पुरे एका भावें भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥ कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं ॥१॥ करावा तो आधीं सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेनें सर्व साधे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें ॥१॥ जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाहीं कांहीं चित्तीं शमदम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण ॥१॥ भ्रमलिस आरजे न पाह्सी आपणाकडे । धारिष्ट केवढें पाहें तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाजचिली डांक चौक ठेवियला वो । ठायीं पंढरींचे विठठले तुज हाकारा केला वो ॥१॥ रंगा येईंवो खेचरे विठाई सुंदरी वो । तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी द्दष्टी देखेन वो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाजवोनी वेणू पसरिलें जाळें । आम्हांसी न कळे कपटिया तूं ॥१॥ दुखवोनी सर्वां टाकियेलें वनीं । गेलासी वधुनी पारधिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव