भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं

vachitan adhyatma janitanhi artha | guruvin vyartha sarva kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं ॥१॥ करावा तो आधीं सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेनें सर्व साधे ॥२॥ योग याग तपें चित्त शुद्ध होय । गुरुवीण नये मोक्ष हातां ॥३॥ निर्मळ जीवन तीर्थावीण पावन । तैसा गुरु जाण साधकांसी ॥४॥ नामा म्हणे गुरु कृपेचिया बळें । मूर्खहा तरेल भाक माझी ॥५॥