भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदावें तें काय निंदावें तें काय । सर्वांठायीं पाहें कों-दाटलें

vandaven ten kay nindaven ten kay | sarvanthayin pahen kon-datalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वंदावें तें काय निंदावें तें काय । सर्वांठायीं पाहें कों-दाटलें ॥१॥ आहे कवणा ठायीं नाहीं कवणा ठायीं । ठायींच्या पैं ठायीं कोंदाटलें ॥२॥ रविरश्मीचें तेज सर्वांठायीं असे । त्या परि अनायासें बुजतु जाय ॥३॥ भाव तेंचि ब्रह्म ब्रह्म तेंचि कर्म । जा-णोनियं वर्म ह्मणे नामा ॥४॥