भजनी मालिका
← भजनांकडे परत

वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें

van vruksha valli ishvarasaman | rushi munijan rahati jethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥ होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥ मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे । जाले पहा धडफुडे ब्रह्मरुप ॥३॥ पंचमहापातकी गेले आळंकापुरीं । न चाले त्याजवरी काळ यम ॥४॥ सांगताती देव ऐकती रुक्मिणी । नामा म्हणे चक्रपाणि वर दिला ॥५॥