भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला

vat pahaten mi dolan | kan ga na yesi viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला ॥१॥ तूं वो माझी निज जननी । मज कां टाकियेलें वनीं ॥२॥ धीर किती धरूं आतां । कव घालीं पंढरिनाथा ॥३॥ मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥४॥ सर्व जिवांचे स्वामिणी । म्हणे जनी माय बहिणी ॥५॥