भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा

viththal mauli krupechi konvali | athavitan ghali premapanha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥ तुजविण जिवलग दुजें कोण होईल । ते माझे साहिल जड भारी ॥३॥ तूं माझी माउली मी वो तुझा वच्छ । परतों परतों वास पाहे तुझी ॥४॥ माया मोहें कैसी न विसंबे सर्वथा । अंतरींची व्यथा कोण जाणे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठ्ले कां गे रुसलिसी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥