भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठा नामायाचा आला पंढरपुरा । भेटला सोयरा विटेवरी

vitha namayacha ala pandharapura | bhetala soyara vitevari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठा नामायाचा आला पंढरपुरा । भेटला सोयरा विटेवरी ॥१॥ सुखदु:ख अवघें सांगितलें श्रीहरी । धरणें तुझे द्वारीं घेईन देवा ॥२॥ नामयासारिखा आणिक कोणी आहे । सृष्टिमाजी पाहें विचारुनी ॥३॥ नामा माझा सखा जिवाचा तो जीव । त्याचा आहे भाव माझे ठायीं ॥४॥ मजवांचूनि नामा दुजें नेणे कांहीं । मी त्याचे ह्रदयी सदा असें ॥५॥ नामयानें नाम जोडिलें निधान । ठेविलें सर्व धन तुझ्या पायीं ॥६॥ समर्थासी कांहीं बोलूं नये आतां । ठेवणें कृपानाथा देईं वेगीं ॥७॥ चहूं युगीं नामा सांगातेचि आहे । वेगळा कांहीं नोहे क्षणभरी ॥८॥ माझिया बापाची तुजजवळ ठेवी । विठा म्हणे द्यावी केशीराजा ॥९॥