भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले

vithathal rukminisahit garud hanumant | anik sant mahant jama jale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥ गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥ लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥ नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥