भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज ॥१॥ जें शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज । सकळ मंत्रराज मंगलानिधी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥१॥ पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी ॥१॥ तो न आणावा पैं दृष्टी । तोचि दोशी एक या सृष्टी । तो होईल महा कष्टी । हरीसिन भजतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥ कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥

रचनाकार: संत नामदेव

वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ॥१॥ नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांसी न कळे शास्त्रें पैं भांडती । श्रुति विवादती ब्रह्मालागीं ॥१॥ आवघेचि कर्मामुक्त उपदेश धर्म । हारपती पैं कर्में गुरुसेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥ नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेळोवेळां तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥ मागें बहुतांनीं केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥ वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठाहूनि केलें पेणें । भक्त प्रर्‍हादाकारणें ॥१॥ नर-हरि पावला पावला । महापापा पळ सूटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥१॥ क्षीरसागरीं पाहें तों तेथें निद्रिस्त । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । म्हणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥ संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चित्तारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैष्णव तो कबीर चोखामेला महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥ सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं ॥१॥ सारी रात्र कीर्तन केलें त्रयोदशीं । चतुर्दशी दिवशीं भोजनें केलीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥ सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव