भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चित्तारिती

vaishnav to ek itar tin songen | thase deuni angen chittariti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चित्तारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥ नाइकोनी ब्रम्हाज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥३॥ विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन । पाखांडी हें म्हणे करिती काई ॥४॥ पंचरस पात्रा कांता हे बडविती । उद्धरलों म्हणती आम्ही संत ॥५॥ कीर्तनाचा द्वेष करी तो चांडांळ । तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥ वैष्णव तो एक चोखामेळा महार । जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥