भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं

vaishnavannin keli samadhi pradakshina | gele achamana bhogavatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं ॥१॥ सारी रात्र कीर्तन केलें त्रयोदशीं । चतुर्दशी दिवशीं भोजनें केलीं ॥२॥ अमावास्ये जागरण केलें परिपूर्ण । प्रतिपदे गमन वैष्णवांचें ॥३॥ निवृत्ति मुक्ताई जाली उदासी । आतां ह्रषिकेशी बोळवावें ॥४॥ चांगा म्हणे माझी करा बोळावण । घेऊनि नारायण समागमें ॥५॥ नामा म्हणे देवा माघ मास नेमा । चांगदेवा प्रेमा समाधि देऊं ॥६॥