भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो कबीर चोखामेला महार । तिजा तो चांभार रोहिदास

vaishnav to kabir chokhamela mahar | tija to chambhar rohidas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैष्णव तो कबीर चोखामेला महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥ सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥ कमाल फुलार मुकुंद जोहरी । जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥ राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥ त्या वैष्णवाचरणीं करी ओंवाळणी । तेथें दाशी जनी शरीराची ॥५॥