भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठाहूनि केलें पेणें । भक्त प्रर्‍हादाकारणें

vaikunthahuni kelen penen | bhakta prar‍hadakaranen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैकुंठाहूनि केलें पेणें । भक्त प्रर्‍हादाकारणें ॥१॥ नर-हरि पावला पावला । महापापा पळ सूटला ॥२॥ शंख चक्र पद्म गदा । महापापा पळ सूटला ॥३॥ पावला गरुडध्वज । नामया स्वामि केशवराज ॥४॥