भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी

vithathanamin alas na kari gavhara | vayanchi verajhara shinatosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी ॥१॥ हरी उच्चारण करी हा विचार । नामचि साचार उद्धरण ॥२॥ मी म्हणताम अहंता वाढे हे सर्वथा । परी भजनापरता नाहीं मार्ग ॥३॥ मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा । विठ्ठलनाम पाठा वोळगे जना ॥४॥ सर्ग हें लटिकें मोहजाळ फिकें । नामेंविण एके नाहीं दुजें ॥५॥ नामा म्हणे उपदेश भजे केशवास । वैकुंठनिवास वोळगे तुज ॥६॥