भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी

valavantin ubha karen kuravalil | jivinchen pusel jad-bhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥ हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥ शोभतसे पायीं भक्त ब्रिदावळी । जीवासी सांभाळी दीनानाथ ॥३॥ माझा अभिमान धरून मानसीं । नामा ह्मणे होसी भक्तां साह्य ॥४॥