भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाहातसे नेत्रीं इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया

vahatase netrin indrachiye nir | aparadhi thor devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाहातसे नेत्रीं इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया ॥१॥ क्षमा करीं आतां अच्युता अनंता । अगा कृष्ण-नाथा दीनबंधू ॥२॥ तुझिया दासासी दु:ख म्यां दिधलें । भ्रांतीनें मोहिलें मन माझें ॥३॥ दावीं तुज थोरी न करींच सेवा । करा दंड देवा मजलागीं ॥४॥ तूंचि माझा बाप तूंचि माझी आई । क्षमा कृष्णा-बाई करीं आतां ॥५॥ दैत्य मारावया भूतळीं आलासी । भक्तांला रक्षिसी निरंतर ॥६॥ जगद्नुरु माझा धनी वनमाळी । जोडोनि आंजुली उभा असे ॥७॥ चतुर्भुज गळां वैजयंती माळा । पाहातसे डोळां नामा ह्मणे ॥८॥