भजनी मालिका
← भजनांकडे परत

वानारांच्या संगें स्वयें क्षेम देसी । मज ह्रषिकेशी न बोलावें

vanaranchya sangen svayen kshem desi | maj hrashikeshi na bolaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वानारांच्या संगें स्वयें क्षेम देसी । मज ह्रषिकेशी न बोलावें ॥१॥ रिसांपाशीं सदा स्वाभावें तुम्ही खेळा । माझिया कपाळा नातुडसी ॥२॥ पक्षि जटायूचें लेंकरूऊं तूं होसी । माझ्या कां मनासि नातुडसी ॥३॥ लावोनि चरण तारियेली शिळा । कोळियाचा केला अंगिकार ॥४॥ नामा म्हणे तुम्हां सांगावें म्यां किती । राग माना चितीं काय वाणुं ॥५॥