भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढवेळ कां लाविला । कोण्या भक्तें रे गोंविला

vadhavel kan lavila | konya bhakten re gonvila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाढवेळ कां लाविला । कोण्या भक्तें रे गोंविला ॥१॥ झडकरी यावें बा विठ्ठला । आळवितां कंठ सोकला ॥२॥ वाट पाहें दाही दिशा । जिवीं धरोनि भरंवसा ॥३॥ न कळे का धरिले उदास । मज तो वाटती निरास ॥४॥ केव्हां येईल माझा हरी । आळंगील चहुंकरीं ॥५॥ नामा गहिंवरें दाटला । देह धरणिये लोटला ॥६॥