भजनी मालिका
← भजनांकडे परत

वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें

vamasavya dohinkade | dekhun krushnachen rupaden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥ आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥ चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥ माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥४॥ सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥