भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारित हो श्रीपती । जे म्याम जावें वनाप्रती

vicharit ho shripati | je myam javen vanaprati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विचारित हो श्रीपती । जे म्याम जावें वनाप्रती ॥१॥ राखावया गायी । भार उतरावया मही ॥२॥ एके दिनीं सायंकाळीं । नंदा पुसे वनमाळी ॥३॥ उद्या जाईन मी राना । घेऊनियां जी गोधना ॥४॥ बुद्धीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥५॥