भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी

vadho lage hari nandache mandirin | nana krida kari nitya navi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥ देखोनियां चोज भुलल्या नरनारी । देहभावें वरी वोंवाळिती ॥२॥ सांवळें गोजिरें दिसे नेत्रालागीं । ह्मणोनि वोसंगी सदा घेती ॥३॥ नाचे उडे बोले मंजुळ बोबडे । तेणें वेदां पडे मौन्य सदा ॥४॥ नित्य नवी लीला दाखवी अपार । मन तेथें स्थिर लांचावलें ॥५॥ नामा म्हणे गोप त्यासंगें रतले । प्रेमानें मातले एकसरें ॥६॥