भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया

varanvar kay vinavaven atan | samajaven chitta apuliya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥१॥ तूं काय म्हणसी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उठोनियां ॥२॥ मजलागीं देव जासी चुकवोनी । आणिन धरूनि तुजलागीं ॥३॥ दृढ भक्तिभाव प्रेमाचा ह दोरा । बांधीन सत्वर तुझे पायीं ॥४॥ नामा म्हणे विठो बोल काय आतां । भेटावया सर्वथा यावें बरें ॥५॥