भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या

vitevari ubha dinancha kaivari | bhetaya ubhari donhi vahya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या ॥१॥ गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥ ऐसा दयावंत घेत समाचार । लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥ सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायीं ॥४॥ नामा ह्मणे तया संतांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे ॥५॥