भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम