भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें

santanchi stuti te darshanachya yogen | padilya prasangen aisi kijen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वेसी ॥२॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळी ॥३॥