भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा

akhand jaya tujhi priti | maj de tyanchi sangati | mag mi kamalapati | tuj ba nanin kantala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥ पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥ तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥