भजनी मालिका
← भजनांकडे परत

अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें

akshai ten jhalen | atan na mode rachilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥ पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥ होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥ तुका म्हणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥