भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी

akhand sant nindi | aisi durjanachi buddhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी ॥१॥ काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥ जो स्मरे राम नामा । तयासी म्हणावें रिकामें ॥२॥ जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावें भिकारी ॥३॥ तुका म्हणे विंचाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥