भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा

santoshe mauli arusha vachani | vorasoni stanin lavi bala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥ सेवा करी साहे निष्ठुर उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥ तुका म्हणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता तै सकळ कांहीं नेणें ॥३॥