अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले
agnimaji gele | agni houni tech thele
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥ काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
agnimaji gele | agni houni tech thele
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥ काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥ध्रु.॥
agnimaji pade dhatu | lin houni rahe antu | hoy shuddha na pave dhatu | patatantupramane
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥ बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
achal na chale aisen jalen man | dharuni nijakhun rahilon te
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते ॥१॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥
adnyanachi bhakti ichchhiti sampatti | tayachiye mati bodh kaincha
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥
ajhuni kan thir pora na mhanasi kir | dharuniyan dhir laje bur nighala
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरीलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥
adachanichen dar | baher maji pais phar
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥ काय करावें तें मौन । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
anurenuyan thokada | tuka akashaevadha
अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुनि सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
antarali khuti meti | bhay dharuniyan potin | mhanatan jagajethi | dhanven karunauttarin
अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥ बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥
antaray pade govindin antar | jo jo ghyava bhar to to badhi
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥
antaricha bhav janoniya guj | taise kele kaj panduranga
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
antarinchi gheto godi | pahe jodi bhavachi
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
antarinchi jyoti prakashali dipti | mulinchi je hoti achchhadili
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥ तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न समाये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥
antarinchen god | rahen avadichen kod
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥ संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥
antarinchen janan | tari kan yeun dilen mana
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
antarinchen dhyan | mukhya ya nanven pujan
अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥१॥ उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥
ati jalen uttam veshyechen lavanya | pari te savasin na mhanavi
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
ativad lavi | ek bot song davi
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥
ativadi navhe shuddha ya bijacha | olakha jaticha antyaj to
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
advay chidvay jhalen chi karan | dharilen narayanen bhaktisukh
अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥ अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥
advaitin ton nahi | majhe samadhan henchi anushthan nam tujhe
अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे ॥१॥ करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥ध्रु.॥