भजनी मालिका
← भजनांकडे परत

अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार

adachanichen dar | baher maji pais phar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥ काय करावें तें मौन । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥ बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥ नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥