भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे

advaitin ton nahi | majhe samadhan henchi anushthan nam tujhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे ॥१॥ करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥ध्रु.॥ देव भक्त सुखाच सोहळा । ठेउनी निराला दावी मज ॥२॥ तुका म्हणे आहे तुझे हे । सकळ कोण्या एके काळे देई मज ॥३॥