भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरी स्मरला नाहीं तुज ॥१॥ प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥ विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरी चित्तीं वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा ॥१॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम