भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरी स्मरला नाहीं तुज

ajamela ant maranasi ala | tonvari smarala nahin tuj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरी स्मरला नाहीं तुज ॥१॥ प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥ तुका म्हणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥