भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

aji anandu re eki paramanandu re | jaya shruti neti neti mhanati govindu re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥ विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥ सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥ तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमुचें कवतुक ॥३॥