आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा
atan karava kan sons vanyanvin | latika chi sin manasi ha
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥ असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
atan karava kan sons vanyanvin | latika chi sin manasi ha
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥ असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥
atan kadhakadhi karo ga pandharinatha | nahin tari vanyan gelon das
आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥
atan kashasathi duri | antar uri rakhili
आतां काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥ करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळींचिया ॥ध्रु.॥
atan kanhin sos na karin anik | dharin ten ek hen chi drudh
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
atan keshiraja he chi vinavani | mastak charanin thevitasen
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥
atan gaun tuj oviya mangalin | karun gadaroli harikatha
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा ॥१॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥
atan gun dosh kay vicharisi | mi ton ahe rasi patakanchi
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥ पतितपावनासवें समागम । अपुलाले धर्म चालवीजे॥ध्रु.॥
atan ghei majhen | bhar sakal hi ojhen
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥ काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
atan chakradhara | jhani ahmans avhera
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥ तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥
atan chukalen bandhan gelen visaroni dan | apule te van savakash vikave
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥
atan jaga re bhai jaga re | chor nijalya naduni bhaga re
आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥ कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥
atan javen pandharisi | dandavat vithobasi
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥ जेथें चंद्रभागेचिया तिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥
atan tari pudhen hachi upadesh | naka karun nash ayushyacha
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
atan tari maj sanga sach bhave | kay myan karaven aisen deva
आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥ चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघा चि ॥ध्रु.॥
atan talamal | keli pahije shital
आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥ पाहा करील तें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥
atan tuj kalel ten karin | tarisi tari tarin marin | javali athava duri dharin | ghali sansarin athava nako
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥
atan tujha bhav kalon ala deva | thakuniyan seva ghesi majhi
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥
atan tujhen nam gat asen gitin | mhanoni maniti lok maj
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥
atan dusaren nahin manin | niranjani padilon
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों ॥१॥ तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥
atan deva mokalilen | tumhi bhalen disena
आतां देवा मोकलीलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥ आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥