भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों

atan dusaren nahin manin | niranjani padilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों ॥१॥ तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥ तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा दिनांचा ॥३॥