भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करील वांयां ॥१॥ सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां येथें झाली जीवा संवसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥ आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकलीलों ॥१॥ जनाचारामध्यें उडाला पातेरा । झालों निलाजिरा म्हणऊनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥ ऐसें सांगोनिया झालों उतराईं । आणीक तें काईं माझे हातीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥ मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येईल ठाया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां हें शेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥ नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी आम्हां देई जीवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥ दास्यत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम