भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा

adi madhya ant dakhavila dipen | ha ton apanapen yatna bara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥ दास्यत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥ उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥ तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥३॥