भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे

atan vanton nedin apulen hen man | na sodin charan vithobache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥ यावें जावें आम्हीं देवा चे सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥२॥ काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥ तुका म्हणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥४॥