भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा

adi vartaman janasi bhavishya | magen pudhen nis sanchitacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥ आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥ तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥३॥