आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें
anik aisen kothen sanga | panduranga sarikhen
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥ दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
anik aisen kothen sanga | panduranga sarikhen
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥ दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥
anik kanhin ya uttarachen kaj | nahin atan maj bolavaya
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
anik konacha na karin mi sang | jenen hoy bhang majhya chitta
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥
anik dusaren maj nahin atan | nemilen ya chittapasuniyan
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥
anik naka karun cheshta | vhal kashta varapadi
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥ सुखें करा हरीकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥
anik nahin nenen | asen payanchya chintanen
आणीक नाहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥
anik pakhanden asati udanden | talamilati pinden apuliya
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥१॥ त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥
anik maj kanhin navadati mat | ek pandharinathavanchuniya
आणीक मज कांहीं नावडती मात । एक पंढरिनाथवांचुनिया ॥१॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥
anik myan kona yaven kakulati | kon kama yeti antakalin
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥ तूं वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥
anik ya kalen na chale upay | dharave te pay vithobache
आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥
anike kay thodin | pari ten phar khotin kudin
आणीके काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥ सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥
anuniyan mana | avaghya dhandolilya khuna | dekhila to rana | pandharapuranivasi
आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥
ant hari baher hari | harinen gharin kondilen
आंत हरी बाहेर हरी । हरीनें घरीं कोंडिलें ॥१॥ हरीनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥
atan ason mana abhaktanchi katha | na hoi dushchita harinamin
आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥
atan amhan hen chi kam | vache gau tujhen nam | vahuniyan tali prem | sukhen anande nachaven
आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
atan avashyak karanen samadhan | pahilen nirvan na pahije
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥ केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥
atan ashirvad | majha aso sukhen nand
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥ ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥
atan ahe nahin | na kale ali kara kanhin
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥
atan ughadin dole | jari adyapi na kale | tari matechiye khole | dagad ala potasi
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥
atan aisen karun | doghan dharuniyan marun
आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥ मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥