भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे

atan avashyak karanen samadhan | pahilen nirvan na pahije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥ केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥ नाहीं भक्तीराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥ तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥