भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया

anik pakhanden asati udanden | talamilati pinden apuliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥१॥ त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥ दृढ एक चित्तें झालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुम्हांसी ते ॥२॥ पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥३॥ तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येईल तुम्हां ॥४॥