भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक नाहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें

anik nahin nenen | asen payanchya chintanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक नाहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥ भांडवल सेवा। हाचि ठेवियेला ठेवा ॥२॥ करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥