आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला
aji divas jhala | dhanya soniyacha bhala
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥ झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
aji divas jhala | dhanya soniyacha bhala
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥ झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥
aji baraven jhalen | majhen maher bhetalen
आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें ॥१॥ डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥
adnya paluniyan asen ekasaren | tumachin uttaren santanchin hin
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथुनें चि॥ध्रु.॥
athavunchi nendi avadi anik | bharuniyan lok tinhi rahe
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
athave dev to karava upav | yer tajin vav khatapata
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥ होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
ad pade kadi | tari te bahut pani khodi
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥
adakalen devadvar | vyartha kay karakar
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥
adaliya jana hosi sahakari | andhaliyakarin kathi tun chi
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥१॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥
adava to ubha | ase datoniyan prabha
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥ देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥
anik mat majhya navade jivasi | kay karun yasi panduranga
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥ मुखा तें चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥
anikan upadeshun nenen nachon apan | mundha vanyan marageli vanyan hanse jan
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥ तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥
anikan chhalavaya jalasi shahana | svahita ghatale khanen | adike paike karuni sayas
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
anikanchi seva karavi shariren | tin yethen uttare koradin cha
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥
anikanchi stuti amhan bramhahatya | eka vanchuni tya panduranga
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
anikanchya kapiti mana | nishthur par nahin
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीं ॥१॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
anikanchya ghaten | jyanchin nivatil chitten
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
anikanchya ghaten manitan santosh | sukhaduhkh dosh angin lage
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥
anikansi tari aisa nahin koni | dhad ten nasoni bhalata taki
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥
anitan tya gati | hans kaule na hoti
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥ सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥
anilen sevata | atan kama naye phanta
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥ मज आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥